Sunday, April 28, 2013

Harishchandragadh Trek

Thanks a lot to my friend Rahul who took time and pain to write our experience about Harishchandragadh Trek. 

हरिश्चंद्रगड 
२६ जानेवारीला मेगा ट्रेकचे हे सलग पाचवे वर्ष आहे, पण काही कारनामुळे ह्या वर्षी २६ ऐवजी २ फेब्रुवारीला जायच ठरलं. तस हरिश्चंद्रगड करायचं पावसाळ्यात ठरलं होतं, पन तेव्हा न जमाल्यामुळे ह्यावेळी तोच करायचं ठरलं. शक्यतो आम्ही ठरलेली तारीख बदलत नाही पण ह्यावेळी ती पुढे ढकलावी लागली शेवटी तारीक ठरली १६-१७ फेब. ट्रेकला १० जन तयार होते, शेवटी किती येतील हा प्रश्ना होतच, पन शेवटपर्यंत कोणीही गळालं नाही. १० म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग संख्या होती.
हरिश्चंद्रगड म्हणजे ट्रेकर्सची पंढरी. गडाला दोन-चार हजार वर्षाची पौराणिक परंपरा लाभली आहे. हा किल्ला पुणे, नगर आणि ठाणे हे तिन्ही जिल्हे जिथे एकत्र मिळतात, त्यातल्या सर्वात उंचावर असलेल्या डोंगरावर वसलेला आहे.  पापे, इंदर, परागने जायचा प्लान ठरवला. सर्वांचा फिटनेस लक्षात घेता जाताना सोपा असा पाचनई मार्ग आणि येताना टोलार खिंड मार्गे खिरेश्वर. जाताना येताना वेगळा मार्ग असल्यामुळे लाल डब्याने जाणे भाग होतं. लाल डब्याने जायचं म्हणून पण भारी वाटत होतं(सुरुवातीला).
तर प्लान प्रमाणे पहाटे 6.45 ची बस पकडायची होती त्यामुळे बरोबर 6.30 वाजता शिवाजीनगर स्टेशनवर भेटायचं ठरलं. ठरल्या वेळेप्रमाणे मी आणि हरीश बरोबर 6.30 ला पोचलो (नेहमीप्रमाणे ऑन टाइम), प्रसाद आधीच पोचला होता. इंदर आणि परागला फोन केला तर ते अजुन घरीच होते. म्हणजे निघायला बराच वेळ लागणार होता, मग नाश्ता करायला हॉटेलात घुसलो. जास्त रिस्क नको म्हणुन इडली सांबारची ऑर्डर दिली, प्लेट मधे बघितलं तर 3 इडल्या… लाई भारी….पहिला घास खाल्ला एकदम बकवास…..तेव्हा समजलं की साल्याला कालच्या इडल्या संपवायच्या होत्या. थोड्या वेळाने इंदर आला, डॅनी लेट होईल असं वाटत होतं पण तोही आला.... एकदम स्टाइल मधे (घनन घनन करत). वेस्ट पुणेची टीम (पापे, राजाभाउ, शैलेश, सचिन) आधीच नाशिक फाट्याला पोचली होती. पण परागचा अजुन पत्ता नव्हता, शेवटी साहेब आले मग लगेचच स्टेशनवर पळालो.
शिर्डीला जाणारी बस उभीच होती. बरोबर 7.30 ला बस निघाली म्हणजे अगदी वेळेवर ट्रेक सुरू झाला (आमच्यासाठी एका तास म्हणजे काय लेट नाही). नाशिक फाट्याला बाकीची मंडळी बसली, बरोबर 8.30 ला आळेफाट्याला पोचलो. तिथे मग पाचनईला जाणार्‍या गाडीचा शोध चालू झाला. पापेची इथेपण ओळख निघाली, त्याचा मॅनेजर तिथलाच होता, मग त्याने 1000 मधे गाडी बघून दिली. गाडी यायला वेळ होता त्यामुळे सगळे परत हॉटेलमधे घुसलो. मस्त पैकी मिसळपाव, उत्तापा दाबून बसवला. थोड्या वेळात गाडीपन आली पण पाचनईला जायचय म्हणल्यावर त्याने हात वर केले(त्याला वाटले होते खुबीफाट्याला सोडायचय). मग एका वडापवाल्याशी बोलून 1800 रुपयात डील फाइनल केली. तो पर्यंत 9.30 वाजले होते.

इथून पुढचा प्रवास एकदम मस्त झाला, गाडीतच सभा चालू झाली होती पंकाच्या अनुपस्तित इंदरकडे अध्यक्षपद होते (अघोषित). त्याने क्रिएटिवचे किस्से सांगितले. शैलेशचा किस्सा तर लई भारी होता, कसाकाय आलास तर म्हणतोय बसने आलो. पापे इंटरव्हूमधे रिजेक्ट होणारा एकमेव व्यक्ती आहे ही नवीनच माहिती कळाली. मग इंदरने एका पिच्चरची स्टोरी सांगितली. त्यातला हिट आणि लक्षात रहाणारा डायलॉग म्हणजे “नको प्रकाशssश……!!” सगळी स्टोरी सांगून झाल्यावर पिच्चरच नाव सांगितल “ती रात्र”. स्टोरी सांगेपर्यंत राजा शांत होता, नाव सांगितल्यावर मात्र त्याची ट्यूब पेटली, त्याच्या मित्राने ह्या पिच्चरमधे काम केला होता आणि त्याने प्रेमियर शो पन बघितला होता (विशेष म्हानजे सर्वान्ना मेल करून पिच्चर बघायला सांगितला होता). पुढे Lotas Notes चे वाभाडे निघाले, कारण त्यात (पापेला) ‘Reply to All’ चे बटन सापडत नव्हते, हरीशनेही त्याचे प्रॉब्लेम मांडले इंदरला दोघांनी असा घेतला की त्यानेच Lotas Notes तयार केला आहे.
साधारण 11-11.15 ला पाचनईला पोचलो. कोणीतरी आळेफाट्यावरून द्राक्षे आणली होती ती उतरल्या पासूनच खायला चालू केली (पुढे प्रत्तेक कमर्शियल ब्रेकला एक राउंड होत होता). बरोबर 11.30 ला शिवाजी महाराजांचं नाव घेऊन, हर हर महादेव म्हणून गड चढायला सुरूवात केली. चढन तशी विशेष अवघड नव्हती पण व्यायाम नसल्यामुळे जरा जड जात होती(इथे 'ज' चा उच्चार जाम मधील ज असा करावा). एक सांगायचा राहिलं ह्या वेळी शैलेशने एकच बॅग आणली होती. पन सवईप्रमाणे हात काही मोकळे नव्हते, एका हातात कॅरीमॅट आणि एका हातात कलिंगड …हो कलिंगडच (शैलेशने हौशेने घेतलेले, नको म्हणत असताना...म्हनाला मी कॅरी करतो).
पापे आणि हरीशचा स्पीड चांगला होता, ते बरेच पुढे निघून गेले होते. इंदरची मात्र हवा टाइट झाली होती. चक्कर येऊन पडतोय की काय असं वाटत होतं. वाटेत डॅनीचे सिंहगडचे किस्से चालू होते. कलिंगड आता सचिनकडे आलं होतं. त्याचा पन पेशन्स संपल्यावर कलिंगडाचा बळी द्यायचा ठरला. कलिंगडाची चव भारीच होती, सिझन मधलं पाहिलच असेल (पापेने आणि हरीशने नक्कीच मिस केलं). पुढे एका कमर्शियल ब्रेकला एक गावकरी भेटला ‘कुंडलिक’, त्याच्याशी गप्पा मारताना कळलं की त्याचं गडावर हॉटेल आहे (त्याच्यासाठी हॉटेल पण खरं म्हणजे ते एक साध कुडाचं शेड होतं). मग त्याला आमच्यासाठी एक चांगली गुहा बुक करायला सांगितली. रहाण्याचा व जेवण्याचा प्रश्न मिटला होता.
आत्ता पर्यंत बरेच अंतर चालून गेलो होतो, थोडं पुढे गेल्यावर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर दिसले म्हणजे आम्ही गडावर पोचलो होते तेव्हा 2.30 वाजले होते म्हणजे साधारण 3 तासात गड सर केला होता. मी आणि पराग मंदिरात पोचलो आणि सर्व प्रथम महादेवाचा दर्शन घेतलं. मंदिर खरच आप्रतिम आहे, नवव्या शतकातील हे मंदिर म्हणजे, मानवी कलाकृतीचा उत्तम नमुना. मंदिर पाहून सगळा क्षीण निघून गेला. मंदिराच्या आवारात काही गुहा आहेत. त्यातील काही गुहेत पाणी आहे जे पिण्यासाठी वापरतात (एकदम थंड आणि स्वच्छ). एका गुहेमधे एक चौथरा आहे त्याखाली जमिनीमधे एक खोली आहे. त्या खोलीत म्हने चांगदेव ऋषींनी चौदशे वर्ष तप केले होते (आपल्या दादूला नक्कीच माहिती असणार). सध्या ती खोली शिळा ठेऊन बंद केली आहे. मंदिराशेजारी विष्णूतीर्थ नामक पुष्करणी आहे जे अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. मंदिराचा बाजूने एक ओढा वाहतो यालाच मंगळगंगा नदीचा उगम म्हणतात ही नदी पुढे पायथ्याच्या पाचनई गावातून वाहते. मंदिराच्या थोडं खाली डावीकड़े केदारेश्वराची गुहा आहे, गुहेत ४ फूट उंच शिवलिंग आहे. आधारासाठी पुर्वी ४ खांब होते सध्या फक्त एकच शिल्लक आहे. असे म्हणतात की तोही पडला तर जग बुडी होणार. नेट वर फोटो बघितले होते पण प्रत्यक्षात बघीतल्यावर तेथून हलावस वाटत नव्हतं
इकडे पापे आणि हरीशने एक गुहा शोधून ठेवली होती पण ती लहान होती व झोपायला अवघड होती त्यामुळे दुसर्‍या गुहेचा शोध सुरू झाला. तश्या भरपूर गुहा होत्या पन त्यातल्या त्यात गणेश गुहा बरी होती. कुंडलिकला जेवणाची ऑर्डर आधीच दिली होती, जेवण तयार होईपर्यंत गुहा साफ केली. पोटात कावळ्यान्चि कबड्डी खेळुन झाली होती आता कुस्ती सुरू झाली होती. कुंडलिकच बोलावणं येताच तिकडे धाव घेतली. जेवायला पीठलं भाकरीचा बेत होता. मग काय सगळे तुटून पडले, जेवताना सगळे आवाज बंद फक्त भाकरी आणा !!, पीठलं आणा !! एव्हडेच काय ते बोलणं होत होतं. भाकरीची वाट बघायला नको वाटत होतं. पापेचा ताक-भाकरीचा प्लान होता, पण हरीशने कुस्करलेल्या भाकरीत पीठलं टाकून त्याची वाट लावली. वारा एव्हडा होता की ताटात सगळी शेणाची धुळ उडत होती पण कोणाला काहीच फरक पडत नव्हता, सगळे जेवन्यात गूंग होते.
जेवण झाल्यावर तारामती शिखरावर जायचा प्लान ठरला, प्लान प्रमाने तारामतीवरुन कोकणकड्याला उतरणार होतो. पण काहींचा स्टॅमिना आधीच संपला होता, मग दोन गट पडले एक तरामतीकडे (टीम A) आणि एक डाइरेक्ट कोकणकड्याला जाणार होता(टीम B.... अर्थात मी टीम B मधे होतो….तारामती पूढच्या वेळेस). वाटेत एका ठिकाणी फोनला रेंज आली, सगळ्यांनी घरी कॉल केले(एक महत्वाची जवाबदारी संपली). साधारण 20 मिनिटात कोकणकड्याला पोचलो. समोर रेलिंग दिसत होती पण अगदी जवळ जाईपर्यंत विशेष काहीच दिसत नव्हतं. रेलिंगपाशी पोचलो आणि समोर जे द्रुश्य बघितले त्याने बोलतीच बंद झाली.
कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण….. निसर्गाचा अदभूत चमत्कार. माहिती जालावर खूप वाचलं होतं सुदैवाने फोटो बघितले नव्हते त्यामुळे कडा कसा दिसतो काहीच कल्पना नव्हती, पण जेव्हा प्रत्यक्षात बघितला तेव्हा…. कोकणकडा म्हणजे दुनिया भारी. (अवधूत गुप्तेची सगळी विशेषने लागू पड़तात). झोपून खाली बघीतल्यावर अखंड कडा दिसतो (अर्ध्या किलोमीटर परिघाचा अर्धवर्तुळाकार). कितीही वेळ बघीतलं तरी मन भरत नव्हतं. पायथ्यापासून काड्याची उंची साधारण 4500 फूट भरते. एव्हड्या उंचीवरुन दरीत उडणारे गरूडही आपल्यापेक्षा खाली दिसतात. वरून त्याची भरारी बघने म्हणजे एक वेगळा आणि मस्त अनुभव होता(तो बहुतेक ब्राम्हणी गरूड असावा). कुठे तरी वाचलं होतं की कोकणकड्यावर पावसाळ्यात Cloud busting चा अनुभव घेता येतो. ढग कड्याकडे ओढले जातात व त्यावर आदळतत आणि वेगाने तसेच वर वर जातात. Cloud busting नाही पण त्याची छोटीशी झलक बघायला मिळाली. एका मुलाने त्याची टोपी दरीत टाकली तर ती झपकन 50-60 फूट उंच उडाली…..एकदम सरळ वर आणि मागे येऊन पडली. आम्ही पन मग दरीत उगाच काड़या टाकुन टाइमपास करत बसलो.
थोड्या वेळात जसा सुर्य अस्ताला जाउ लागला, तशी त्याची लाली क्षितीजावर पसरू लागली. काय सुंदर द्रुश्य होत...लई भारी. येथून दिसणारा सूर्यास्त म्हणजे अफलातून, कितीतरी वेळ निसर्गाचा आस्वाद घेत होतो. प्रसाद आणि राजा परत जायचं म्हणत होता, डॅनी कुठेतरी हुंडरत होता. पण माझा तिथून पाय निघत नव्हता (कुठे अडकला नव्हता….असं म्हणायचं असतं). त्यावेळी मला पुण्यातील श्री बर्वे यांची आठवण आली तेच बर्वे ज्यांना कोकणकडा एव्हाडा आवडला की त्यांनी तेथुनच उडी मारली. तेथे एका संगमरवरी पाटिवर याचा उल्लेख केलेला आहे. माझी तशी इच्छा नव्हती पण कोकणकडा बघून तो असा करू शकतो याची खात्री पटली.
गुहेत परतलो तेव्हा अंधार पडला होता पण टीम A चा अजुन पत्ता नव्हता. नंतर बर्‍याच वेळाने ते आले. त्यांनी काढलेले फोटो बघून जरा जळ जळ झाली पण आमच्याकडेही संगण्यासारख खूप काही होत. त्यांना यायला वेळ लागला कारण प्रथेप्रमाणे यावेळिही वाट चुकले ( त्याशिवाय थ्रिल येत नाही). कुंडलिकने आधी तशी पूर्वकल्पना दिली होती. कोकणकड्याची वाट शोधता शोधता जंगलाची वाट पकडली. वेळीच परत फिरले, नाहीतर त्यांचीच वाट लागली असती. कारण एका ब्लॉगवर वाचलं होत की तारामती शिखरामागे दाट जंगल आहे आणि त्यामधे बिबळ्या, कोल्हे, तरस यांचा वावर आहे आणि तिथेच मुक्काम करायची वेळ आली असती तर थंडीने पार …….(समजून घ्या). पण तारामतीवरुन जो नजरा दिसतो.....एक नंबर (टीम B ने नक्कीच मिस केला...पुढच्या खेपेला). तेथून दिसणारे नाणेघाट कळसुबाई आणि त्याचा आजूबाजूचे सुळके तर अप्रतीमच. बरेच गडपण दिसतात, पण ते ओळखता आले पाहिजेत. कोकणकड्यावरुन नानाचा अंगठा दिसतो, त्याच्या बाजूचे बहुतेक हडसर, आलंग, कुलंग, मदनगड आसावेत.
इंदरचे एका शिळेवर काढलेले फोटो तर एकदम जबराट, नुसता फोटो बघितला तरी फाटते. ती शिळा दरीच्या एकदम टोकाला होती, फोटो खरच आप्रतिम आहे. पण फोटोसाठी जीव धोक्यात घालणं मलातरी बरोबर वाटत नाही. कोकणकड्यावर पण काही हौशी मंडळी, कट्यावर बसल्यासारखी दरीत पाय सोडून बसली होती. असलं धाडस करण्यात कसला आनंद मिळतो देव जाणे. अश्या लोकांना Adrenal edict म्हणतात.
आता परत भूक लागली होती, थंडीही वाढली होती. पापे आणि राजाने शेकोटी पेटवली, त्याभोवती मग शेकण्याचा आणि गप्पांचा कार्यक्रम चालू झाला. थोड्या वेळाने जेवायला गेलो, सकाळच्या अनुभवामुळे त्यांनी आधीच भरपूर भाकर्‍या करून ठेवल्या होत्या. चुलिवरची गरम भाकरी, मिक्स भाजी, फोडणीचं वरण, भात असा फक्कड बेत होता. परत दाबून बसवलं, दुपारच्या(जास्त) जेवणाचा काहीही फरक पडला नव्हता.
जेवन उरकेपर्यंत 9.30 वाजले होते, कॅरीमॅट टाकून झोपायची तयारी सुरू झाली. गुहेत रात्र काढायची माझी पहिलीच वेळ...वा काय अनुभव होता. गुहेत पूर्ण अंधार आणि बाहेर हलकासा चंद्रप्रकाश, बाहेर डाव्या कोपर्‍यात झाडाची हलनारी सावली आणि माधेच उडनारं एखाद वटवाघूळ. हॉरर पिच्चरच द्रुष्य वाटत होत. कुंडलिकच्या म्हणण्यानुसार आधीच्या गुहेत थंडी वाजली नसती पण गणेश गुहेत जास्त थंडी वाजते, आता त्याचा प्रत्यय येत होता. त्यात पायाला scramp(cramp) आल्यामुळे झोप नीट लागत नव्हती. बाजूच्या गुहेतील काही YZ मंडळी गाण्याच्या भेंड्या खेळुन झोपमोड करत होती, तेव्हा साधारण 11 वाजले असतील. राजाची सारखी खुसपूस चालू होती, (ती राजाची असल्यामुळे जास्त आवाज येत होता). माधेच जाग आली तर डॅनी आणि राजा शेकोटी पेटऊन बसले होते (राजाचा पाय दुखत होता तर डॅनीची थंडीने फाटली होती), मग काय मी पण त्यांच्यात सामील झालो. आर्धा तास शेकुन जे झोपलो ते डायरेक्ट सकाळीच उठलो.
सकाळी 7.30 पर्यंत सगळे उठले, हवेत चांगलाच गारवा होता, पाणी तर बर्फासारख गार होतं. शेकोटीसमोर बसून मस्त चहा, बिस्कीटे, केक असा नास्ता केला. नास्ता झाल्यावर टीम A चा कोकणकड्याला जायचा प्लान होता, टीम B ने हॉटेलवरच थांबन पसंत केलं (आज बरच चालायचं होतं). मग हॉटेलसमोर उन्हात पत्याचा डाव टाकला. डॅनी परत फोटोग्राफी करायला का हुंडरायला गेला होता. मग आपला आवडता प्रोग्रॅम…..मॅगी करायला घेतली, ती तयार होईपर्यंत टीम A पण आली. मॅगीची जाहिरात ‘बस 2 मिनिट’आम्हाला एकदम लागू पाडते…….पण 2 मिनिट तयार करायला नाही तर संपवायला !!
साधारण 9.15 वाजता परतीचा प्रवास चालू केला. सगळ्यांबरोबर परत मंदिर पहायला गेलो. केदारेश्वर गुहेत काल कड्यावर भेटलेला ग्रूप आंघोळ करत होता…..काय बोलनार असल्या YZना. आता गड उतरायला सुरूवात केली, कुंडलिकने निघताना एक शॉर्टकट सांगितला होता, त्यामुळे सात टेकड्या चालणं वाचणार होतं. तो रस्ता दाट झाडीतून जात होता, त्यामुळे विशेष थकवा जाणवत नव्हता. इंदर आज फूल फॉर्मात होता, बाकीची मंडळी पण आपला फॉर्म टिकउन होती. लंगडे घोडे (मी आणि राजभौ) मागून हळू हळू येत होतो. थोड्या वेळात एका हॉटेलपाशी पोचलो. सरबत पिऊन तरतरी आली. फळांचा ब्रँडअँबेसीटर सचिनने ह्यावेळी संत्री काढली. त्याजागेवरून खाली धरनाचा सुंदर नजारा दिसतो. कोणते धरण आहे ह्यावर चर्चा झाली. कोणी म्हणत होतं हे धरण वेगळे आणि तारामतीवरुन दिसणारे धरण वेगळे. पन प्रत्यक्षात ते एकच आहे आनी ते पिंपळगाव जोगे धारण आहे. त्या हॉटेलवर पाचनाईचे काही गावकरी भेटले, त्यानी बरोबर कुर्राड आनलि होती, त्यांच्याकड़े चौकशी केल्यावर समजलेकी ते भिमाशंकरला चालले होते, तेही पाई. वटेत जंगल असल्यामूळे जंगली श्वापदांपासून सौरक्षनासाठी कुर्राड जवळ ठेवली होती.
तिथून निघालो की लगेच टोलार खिंड चालू होते. टोलार खिंड़ीबद्दल जस एकल होत तशीच ती खतरनाक आहे. एकदम सरळ चढ़न नाशिब आम्ही उतरत होतो. आपल्यामुळे बाकीच्यांना थांबायला लागू नये म्हणून मी पुढे निघालो, बरोबर ते गावकरी होते. गावकर्यांकडून बिबट्याचे, रानटी डुक्करांचे किस्से ऐकत होतो. त्याच्या म्हणण्यानुसार गावात डुककर आल्यापासून बिबटे कमी झालेत कारण बिबटे डुक्करांना घाबरतात. मुळात बिबटे कमी झाल्यामुळे डुककर वाढलीत. मी त्यांना सांगायच्या भानगडीत पडलो नाही (त्यांच्याकडे कुर्राड होती). गप्पा मारता मारता खिंड कधी उतरलो समजलच नाही. (ईथे राजगड-तोरणाचा अनुभव उपयोगी पडला). नवीन मंडळी सावकाश उतरत होती, अनुभवी मंडळी सर्वान्ना मोलाचे मार्गदर्शन करत होते त्यामुळे सर्वजन सुरक्षितपने खाली उतरले. खिंड उतरुण थोड़ा आराम केला, तिथे एक व्याघ्र शिल्प आहे (जे माहितीजालावर बाघीतले होते) पन आपेक्षेपेक्षा ते खुपच छोटे होते.
इथून पूढचा प्रवास जंगलातून आहे, त्यामुळे जास्त त्रास झाला नाही.  वाटेत कुठेतरी इंदरमधला आँड्रॉईड़ (1 का 2) जागा झाला. आज स्टीव जॉब पुराण होतं, खीरेश्वर येईपर्यंत स्टीव जॉबच सगळ आत्मचरीत्र सांगून झाला होतं (माझ्या अंदाज़ाप्रमाने पूर्ण सांगून झालं असाव). हरीश, डॅनी ही भक्त मंडळी मन लाउन ऐकत होती, बाकिचे जानकार मधे मधे त्यात भर टाक़त होते. त्यामुळे चालन्याचा विशेष त्रास जानवत नव्हता. मधे एक पापे स्टाइल किस्सा झाला, Onsite बद्दल चर्चा चालू होती, शैलेश एम्पायर स्टेट बद्दल काहीतरी सांगत होता. मधेच पापे बोलला की एम्पायर स्टेटचे भाव आता कमी झालेत, कारण त्यासमोरूनच फ्लाय ओव्हर तयार होतोय (हयाला एव्हडी कशी माहिती, ज़रा विशेष वाटलं). शैलेश US मधल्या एम्पायर स्टेट बद्दल तर पापे चिंचवड़ मधल्या एम्पायर ईस्टेट बद्दल. हे कळल्यावर तर शीट्ट्याच वाजल्या.
खिरेश्वर आता टप्यात आले होतं. सावली बघून थोड़ावेळ थाम्बलो, ह्या ब्रेकला अँपल बाहेर आले. हया ट्रेकला विविध प्रकारचा फलाहार झाला होता. थोड़याच वेळात गड़ उतरलो, आता गावात जानारा कच्चा रस्ता लागला. गड़ाकड़े मागे वळुन बघितल्यावर गड़ाचे खरे रौद्र रूप दिसते. सर्व बाजूंनी उंचच उंच तासीव कड़े, त्यामुळे गड़ अभेद्य वाटत होता. आतापर्यंत बघितलेल्या किल्ल्यानसारखा नाक्कीच नव्हता. गड़ उतरलो होतो म्हनून बर होतं, जर चढ़ायचा असता तर गड़ बघुनच फाटली असती. गावात बसबद्दल चौकशी केल्यावर समजलं की खिरेश्वर मधूनच एक बस जाते. चला म्हनजे खूबी फटयापर्यंतच 5 किलोमीटर वाचलं होतं. बस यायला अज़ून एक तास होता, भूका पन लागल्या होत्या, म्हनून मग एका हॉटेलात कांदे पोहेची ऑर्डर दिली. बसल्या बसल्या परागने आपल्या कॅमेराचे (आनी त्याचेही) कसब पनाला लाउन इंदर बसलेला खड़क शोधून काढ़ला (फक्त ह्या दोघांनाच समजल, बाकिचे नुसते वास घेत बसले होते(पोहयांचा)). तोपर्यंत पोहे आले, ऑर्डर येईपर्यंत सगळे सुस्तावले होते, पोहे आले की परत चार्ज. 10-12 डिश फस्त करून बस स्टॉपकड़े निघालो म्हनजे बस जिथपर्यंत येते तिकड़े. बस येईपर्यंत एक घराच्या पडवित बसलो. ट्रेक पूर्ण झाला होता, त्याच समाधान सागळ्यांच्या चेहर्यावर दिसत होतं. आता बस पकडून आळेफाटा, तिथुन पुन्याची बस पकड़ली की घरी.....येव्हड सोप होतं.
ज़ास्त वाट बघायला न लावता बस आली, जागा पन मिळाली (दुर्मिळ अनुभव). रस्तापन मस्त होता डावीकड़े उंच उंच कातळ कड़े आनी उजवीकड़े धरणाचे बॅक वॉटर. झोप कधी लागली कळलेच नाही, पन मधेच जाग आली ती बस बंद पडल्यामूळे. ड्राइवरने प्रयत्न केले पन बस काही चालू होइना, म्हनून एक मिनी टेंपो थाम्बवला, तो कुठल्यातरी फाटयावर सोडनार होता (जिथुन आळेफाटयाला जाता येनार होतं). पटापट उतरुण टेंपोत बसलो, राजा भाउ मात्र बारामतिच्या गाड़ीत बसल्यासारखा आरामात उतरला, तोपर्यंत टेंपोमधे उभ राहीलापन जागा शिल्लक नव्हती. कशीतरी जागा बनवून आत शिरला. हा पन वेगळा अनुभव होता त्यामूळे मज़ा येत होती. 10 मिनिटात फाटयावर पोचलो, पन साला तिथुन गाड़ी मिळेना. येनार्या प्रत्तेक गाड़ीला हात करत होतो. पन काही उपायोग झाला नाही. वैतागून काही जन बाजूच्या हॉटेलात गेले. तिथे भारी किस्सा झाला, हॉटेलवाल्याला सात चहाची ऑर्डर दिली तर त्याकड़े पाचच कप होते म्हनून पाच चहा संगीतले. पन बिल घेताना त्याने सात चहाचे पैसे घेतले. इंदरने त्यान्ना आठवन करून दिली की तुमच्याकडे पाचच कप आहेत. तेव्हा त्याला चूक लक्षात आली आणि पाच चहाचे पैसे घेतले.
ईकड़े बाकीची मंडळी गाड़ी थाम्बवन्याचा प्रयत्न चालू होता, एका 407 टेंपोला हात केला तर त्याने लांबुनच नकाराथ्रि हात हलवला, जेव्हा टेंपो पास झाला तेव्हा कारण कळल, तो कोंबड्या घेऊन जानारा टेंपो होता, त्यात आम्हाला कुठे जागा मिळनार. शेवटी प्रयत्नाना यश आले, एक ट्रक थाम्बला पन बाकीची मंडळी हॉटेल मधेच होती ते येईपर्यंत ट्रक निघून गेला. त्यामुळे प्रसाद वैतागला आणि नेहमी प्रमाने टारगेट इंदर झाला (हयावेली प्रसाद माझी जागा चालवत होता). तेवढ्यात एक दुधचा टेंपो थाम्बला. सगळे त्यात दाटी वाटीने बसलो आणि एकदाचे आळेफाटयाला पोचलो. पुण्याला जानार्या गाडयांची चौकशि केली, येनार्या सगळ्या गाड़या आधीच फुल येत होत्या. त्यामुळे शेवटी नारायण गावापर्यंत वडापने जायच ठरल. नारायण गावाला पोचलो, पन तिथूनही पुण्याला डाइरेक्ट बस नव्हती, वडापवाले पन येईनात. हा ट्रेक नंतरचा ट्रेक आता ज़रा जास्तच वाटु लागला. शेवटी जमेल तस, मिळेल त्या गाड़िने जायच ठरल. लगेच एक सॅंन्ट्रो गाड़ी मिळाली, त्यात बसनार्या लकी चौघात मीही होतो. पन मागे राहीलेल्यान्ना गाड़ी मिळेना, मग एक बस मिळाली पन उभ राहूनच याव लागलं. हे ऐकुन जरा वाईट वाटलं (गिल्टी जास्त वाटलं). पूर्ण ट्रेक बरोबर केला थोड़यासाठी ...... त्यापेक्षा त्यांच्याबरोबर बसने आलो असतो तर बर झालं असत अस वाटु लागलं. नंतर त्यांनापन बसायला जागा मिळाली. साधारण 8 वाजता शिवाजीनगरला पोचलो आणि 9.00 वाजता घरी. घरच्या मंडळीन्नी कौतूकाने स्वागत केल (मोठी मोहिम फ़त्ते करून आल्यासारख). 9.30 वाजेपर्यंत सगळे आपापल्या घरी सुखरूप पोचलो होते. आता खरया आर्थाने ट्रेक पूर्ण झाला होता.
आत्तापर्यंत कधि घरी पोचतोय आस झालं होतं पन घरी आल्यावर काहीतरी चुकल्यासारख वाटत होतं. दोन दिवस खुप वेगळे अनुभव घेतले, जाम मज़ा केली. 10 जन होतो पन कुठेही प्रोब्लेम आला नाही उलट जास्त मज़ा आली, ट्रेकिंगला नवीन भिड़ू मिळाले, नवीन टोपननाव पडली…..हरीमून (जे त्याने स्वत्तःच ठेउन घेतले), टू बाय थ्री (ढेरीमुळे टू बाय टू चा आता टू बाय थ्री झाला आहे). ह्या ट्रेकला  नवीन धड़ा शिक लो तो म्हनजे ट्रेकला जायचं तर आपल्या गाड़ीनेच.
रोज़ दिवसातून कितीवेळा मॅनेजरला/प्रोजेक्टला शिव्या दयायचो, पन ह्या दोन दिवसात साधी आठवनही आली नाही (तो पन दोन दिवस निवांत झोपला असेल साला). झोपायचा प्रयत्न करत होतो पन हरिश्चंद्रगड काही डोक्यातून ज़ाइना. तारामती राहीलं होतं…..वाटत होतं सकाळी उठाव आणि तारामती गाठाव, सन्ध्याकाळी परत कोकणकड्यावर जाउन सूर्यास्त बघावा, पीठलं भाकरी खाउन गुहेत शांत झोपाव. मन पुन्हा पुन्हा फ्लॅशबॅक मधे जात होत. पन मग भौतिक जगात परत आल्याची जानीवही होत होती. शेवटी उद्याची चिंता उद्यावर सोडुन दिली आणि शांत झोपी गेलो.


राहुल